Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 1 August 2017

माजी विद्यार्थी संघ



 माजी विद्यार्थी संघ
विंचूर विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची स्थापना..........
उपाध्यक्षपदी श्री.ज्ञानेश्वर सदाशिव दरेकर यांची निवड
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात चालू शैक्षणिक वर्षासाठीची माजी विद्यार्थीसंघाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे सचिव श्री.प्रविण ढवण यांनी माजी विद्यार्थीसंघाच्या स्थापनेचा हेतू व उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. मा.उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली. माजी विद्यार्थीसंघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य कापडणीस पी.टी. , उपाध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर सदाशिव दरेकर, श्री.ज्ञानेश्वर सोनवणे तसेच सदस्य म्हणून श्री.विष्णू वामन मवाळ, श्री.शांताराम खैरनार, श्री.विलास दरेकर, श्री. यशोदीप काशिकर यांची निवड करण्यात आली. नवीन कार्यकारिणीचे विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे. डी.सी. व पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.  यानंतर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांची माहितीजमा करण्यासंबंधी Online form भरणेबाबत व विद्यालयाच्या kbpvidyalayavinchur.blogspot.in या blog संबंधीची माहिती विद्यालयाचे उपशिक्षक व माजी विद्यार्थी श्री.सरोदे पी.ए. यांनी दिली. विद्यालयाचेउपशिक्षक श्री.गाडेकर एस.पी. यांनी विद्यालयातील विविध उपक्रम, व विद्यालयाच्या अडचणी व समस्या यांची जाणीव उपस्थिताना करून दिली.
 






No comments:

Post a Comment