Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday 23 November 2017

शालेय विज्ञान प्रदर्शन

शालेय विज्ञान प्रदर्शन                 दिनांक २३.११.२०१७


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न...................
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात २३ नोव्हेंबर रोजी शालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री.नारायणे गुरुजी होते.  प्रथम कर्मवीर भाऊराव पाटील व ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक श्री.पवार टी.ए. यांनी केले. नंतर कु.पल्लवी जाधव या विद्यार्थिनीने विज्ञानाबद्दल आपले मत व्यक्त केले. यानंतर शिक्षक प्रतिनिधी म्हणून विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.पगारे बी.बी.यांनी विज्ञान प्रदर्शन मागील हेतू आपल्या मनोगतातून स्पष्ट केला. यानंतर खेळणी प्रदर्शन, विज्ञान मॉडेल व उपकरणे, पोस्टर प्रेझेन्टेशन, वैज्ञानिक रांगोळी इ.दालनांचे उद्घाटन विंचूर ग्रामपालिका सरपंच सौ.ताराबाई क्षीरसागर, पंढरीनाथ दरेकर, उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी. व आदी मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के. व आभार प्रदर्शन श्री.शेवाळे एस.एन.यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शन प्रमुख श्री.म्हस्के ए.जे. सर्व विज्ञान, गणित शिक्षक, व सहभागी विद्यार्थ्यांचे प्राचार्य कापडणीस पी.टी.यांनी अभिनंदन केले.
सूत्र संचालन

अध्यक्ष निवड

अनुमोदन

प्रतिमापूजन







विद्यार्थी मनोगत

शिक्षक प्रतिनिधी मनोगत

अध्यक्षीय मनोगत

आभार प्रदर्शन

उद्घाटन समारंभ



विज्ञान उपकरणे




 पोस्टर प्रेझेन्टेशन

विज्ञान खेळणी



रांगोळी प्रदर्शन






No comments:

Post a Comment