Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 27 December 2017

ऑलिम्पिक निवड चाचणीत विद्यालयातील शरयू पवारचे सुयश

ऑलिम्पिक निवड चाचणीत विद्यालयातील शरयू पवारचे सुयश


                  गॅस अॅथाॅरीटी ऑफ इंडिया व NYCS नॅशनल युवा को ऑप सोसायटी लि.यांच्या वतीने देशभरातील धावपटूंची निवड चाचणी घेऊन निवड झालेल्या मुलांना प्रशिक्षण देऊन २०२०.२४ साली जपान येथे टोकियो मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. नाशिक,नगर,धुळे,नंदुरबार, जळगाव या पाच जिल्ह्यातून आलेल्या धावपटूंमधून १०० मी.धावणे मध्ये विद्यालयातील इयत्ता ५ वी तील विद्यार्थिनी कु.शरयू अनिल पवार हिची ऑलिम्पिकच्या पहिल्या चाचणीत निवड झाली आहे. यानंतर ती मुंबई या ठिकाणी रनिंगसाठी जाणार आहे. ती १३.३० सेकंदात १०० मी स्पर्धा पार केली. तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. व सेवकवृंदानी तिचे कौतुक व अभिनंदन केले.










No comments:

Post a Comment