Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 27 January 2018

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन


२६ जानेवारी :- भारतीय प्रजासत्ताक दिन 

 विंचूर विद्यालयात प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा..............

                    विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष मा.श्री.काकासाहेब गुंजाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तीपर गीते सादर केली. तसेच स्काऊट गाईड व एमसीसी संचलन द्वारे ध्वजास मानवंदना देण्यात आली. नंतर भारतीय संविधान प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी घेतली. यानंतर गावातून विविध घोषणा व ढोलताशांच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर इयत्ता १० ब च्या विद्यार्थ्याच्या कडून विद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना वह्या व कंपास वाटप करण्यात आले. नेहरू युवा केंद्रामार्फत निबंध स्पर्धेची पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती उपाध्यक्ष श्री.कैलास सोनवणे, व सदस्य श्री.गोपीनाथ ढवण, नारायणे गुरुजी, सुनिलभाऊ मालपाणी, जगदीश जेऊघाले,  पंढरीनाथ दरेकर व ग्रामस्थ दिनकर चव्हाण, विनायक जेऊघाले, के.के.जेऊघाले, शंकर दरेकर, ज्ञानेश्वर सोनवणे, पी.के.जेऊघाले, राजेंद्र पोतले, साळी सर, बागुल सी.जी. उपस्थित होते. 













































No comments:

Post a Comment