Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 3 January 2018

शाळा सिद्धी - पथक पर्यवेक्षण

शाळा सिद्धी - पथक पर्यवेक्षण  (दिनांक २.१.२०१८)



विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण संपन्न...................
                विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नुकतेच संस्था अंतर्गत शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण संपन्न झाले.  या पथकात चेअरमन सदस्य श्री.रोहमारे एम.टी.(जनरल बॉडी सदस्य), मुख्याध्यापक सदस्य श्री.गायकवाड व्ही.टी.(आश्वी), इतर सदस्य श्री.मांडवडे ए.आर.(चौगाव), श्री.ठोके जे.जे.(पिंगळवाडे), श्री.पगार एस.एस. (आसखेडा), श्री.बनसोडे सर .(आश्वी), श्री.काकुळते आर.आर.(आसखेडा), श्री.सोनवणे पी.बी. (आसखेडा), इत्यादी सदस्य सहभागी झाले. यांनी दिवसभर विद्यालयाचा परिसर, भौतिक सुविधा, अध्ययन-अध्यापन, शालेय नेतृत्व, विद्यार्थी संपादणूक इ.क्षेत्रांची तपासणी केली. विद्यालयातील उपशिक्षक श्री.सरोदे पी.ए. व श्री.निकम एम.एस. यांनी पॉवर पाँइंट प्रेझेन्टेशन व व्हिडीओ यांच्या सहाय्याने विद्यालयाच्या सुविधा,सहशालेय उपक्रम, इतिहास व भविष्यकालीन योजनांची माहिती मान्यवरांना करून दिली. तसेच श्री.जोपळे के.जी., श्री.गवळी एन.पी., श्री.भोये एन.जे, श्री.भोईटे एस.एम.श्री.गाडेकर एस.पी.श्री.पाटील ए.एच. श्री.चांदे आर.के यांनी पथक पर्यवेक्षण यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले व सर्व रेकॉर्ड उपलब्ध करून दिले. शाळा सिद्धी पथक पर्यवेक्षण यशस्वीपणे पार पडल्याबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी. व पर्यवेक्षक श्री.साळुंके ए.पी. व पगार एस.पी. यांनी मान्यवरांचे सर्व शिक्षक, विद्यार्थी यांचे आभार मानले.












No comments:

Post a Comment