Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Friday 11 August 2017

शिक्षक-पालक संघ -उच्च माध्यमिक



विंचूर येथील ज्युनियर कॉलेज मध्ये शिक्षक पालक संघाची स्थापना..........
उपाध्यक्षपदी श्री.सुनिल बोचरे यांची निवड
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये चालू शैक्षणिक वर्षासाठीची शिक्षक पालक संघाची स्थापना करण्यात आली. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संघाचे सचिव प्रा. श्री.वर्पे यु.बी. यांनी पालक शिक्षक संघाच्यास्थापनेचा हेतू व उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारिणीची निवड करण्यात आली. पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य कापडणीस पी.टी. , उपाध्यक्ष श्री.सुनिल बोचरे, सहसचिव सौ.कांता दौंड व श्री.ज्ञानेश्वर नागरे तसेच सदस्य म्हणून श्री.गोविंद साळुंके, सौ.कुसुम क्षिरसागर, संजय गडाख, अशोक देवकर, दत्तात्रय जेऊघाले यांची निवड करण्यात आली. याचबरोबर मागील वर्षातील कार्यकारिणीचे विद्यालयाचे उपमुख्याध्यापक श्री.लाटे. डी.सी. व पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.  यानंतर प्रा.क्षिरसागर एम.एन.  यांनी कॉलेजमधील विविध उपक्रम, विविध परीक्षांचे निकाल व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दलची माहिती पालकांना दिली. पालक प्रतिनिधी सौ बोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.शेवटी आभार प्रदर्शन प्रा.शिंदे एस.डी.यांनी केले.












No comments:

Post a Comment