Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 1 August 2017

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती

लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती

विंचूर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी...........
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. व पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. यांच्या हस्ते टिळकांच्या व अण्णाभाऊंच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.  यानंतर विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी कु.मानसी अढांगळे, कु.निकिता सुपेकर, शुभम सोनवणे, कु.साक्षी दरेकर, जोएफ शहा इ. नी भाषणे केली. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.ज्ञानेश्वर बनसोडे व श्री.भोईटे एस.एम. यांनी व लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पल्लवी जाधव हिने केले व आभार प्रदर्शन जयदीप काशिकर याने केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.


















No comments:

Post a Comment