Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 9 August 2017

रक्षाबंधन



विंचूर विद्यालयात वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन साजरे..........
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये रक्षाबंधन सण एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील सर्व मुलीनी सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व इतर कर्मचाऱ्याना राख्या बांधल्या. तसेच विद्यालयातील महिला शिक्षकांनी देखील शिक्षकांना राख्या बांधल्या. विद्यालयातील उपशिक्षिका श्रीम.विद्या कुलकर्णी यांनी रक्षाबंधनाचे महत्व व बहीण-भाऊ यांतील असलेल्या पवित्र नात्यांसंबंधी आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी विद्यालय परिसरातील सर्व वृक्षांचे पूजन  रक्षाबंधन केले व त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वतः घेतली. विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी., उपमुख्याध्यापक श्री.लाटे. डी.सी. व पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या या अनोख्या उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के.  यांनी केले.























No comments:

Post a Comment