Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 6 September 2017

शिक्षक दिन

शिक्षक दिन
विंचूर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा............


५ सप्टेंबर :- शिक्षक दिन (अहवाल)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिक्षक दिन हा इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांच्या मदतीने साजरा केला जातो. याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिपाई यांची भूमिका करण्याची संधी एका दिवसासाठी विद्यार्थ्यांना दिली जाते
सन २०१७.१८ या शैक्षणिक वर्षातील शिक्षक दिनाचे नियोजन प्राचार्य श्री. कापडणीस पी.टी व सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.चांदे आर.के. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे उपशिक्षक श्री. सरोदे पी.ए. यांनी केले. सर्व प्रथम शिक्षक दिनी कामकाज बघण्यासाठी इयत्ता १० वी च्या वर्गातील उस्फुर्त विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रत्येक तुकडीतून विद्यार्थी निवडून त्यांना मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिपाई यांच्या भूमिका वाटप करण्यात आले. सदर दिवसाचे संपूर्ण नवीन वेळापत्रक तयार करण्यात आले. विद्यार्थी एक दिवस शाळेचे संपूर्ण कामकाज बघणार असल्याने खूपच आनंदी होते. दिनांक ६.९.२०१७ रोजी सकाळ सत्रात विद्यार्थी शिक्षकांनी स.७.४५ ते ११.४५ व दुपार सत्रात ११.४५ ते २.४५ या कालावधीत अध्यापनाचे कामकाज केले. उच्च माध्यमिक वर्गासाठी प्रा.श्री.बोरसे ए.टी. यांनी शिक्षक दिनाचे नियोजन केले. इयत्ता १० वी अ मधील विद्यार्थिनी कु.जाधव चंदन रमेश – मुख्याध्यापक, इयत्ता १० वी ब मधील विद्यार्थिनी कु.गिते पूजा प्रभूशंकर – उपमुख्याध्यापक, इयत्ता १० वी क आणि ड मधील विद्यार्थिनी कु. तिपायले प्रगती राजेंद्र, वाघ रोहिणी संजय – पर्यवेक्षक यांनी कामकाज पाहिले.
त्यानंतर २.४५ ते ४.३० या दरम्यान सभेचा व सत्कार समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमासाठी अध्यक्ष निवडीची सूचना कु. साक्षी जोशी हिने मांडली तर त्यास सर्वानुमते अनुमोदन कु.सानिया पठाण हिने दिले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.बनसोडे डी.के. यांनी भूषविले. विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी., पर्यवेक्षक श्री.साळुंके ए.पी. व श्री.पगार एस.पी., जेष्ठ शिक्षक श्री.ढवण पी.जी., श्री.गवळी एन.पी., श्रीम.कुलकर्णी व्ही.एस. व विद्यार्थी शिक्षक, शिक्षिका यांचे हस्ते सर्वपल्ली राधाकृष्णन, कर्मवीर आण्णा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.सायली पवार हिने केले. त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थी शिक्षकांनी गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. कु.चंदन जाधव, काळे योगेश, साळवे कोयल, सोनवणे शुभम, पवार वैभवी, शेख जुबेर, अढांगळे मानसी, घोटेकर आदित्य, डुंबरे संजना इ.नी शिक्षक दिनानिमित्त आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले. विद्यालयाचे उपशिक्षक व कार्यक्रमाचे मुख्य वक्ते श्री.जे.पी.पाटील यांनी शिक्षक प्रतिनिधी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बनसोडे डी.के. यांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शिक्षक दिनानिमित्त मेहनतीचे महत्त्व समजावून सांगितले. आभार प्रदर्शन कु.कानडे स्वरूपा हिने केले. शेवटी वंदे मातरम झाल्यानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.दीक्षा वाघ व कु.कानडे ऋतुजा यांनी केले.

१.सकाळ सत्र :- परिपाठ








२.सकाळ सत्र :- अध्यापन कार्य









३.दुपार सत्र :- परिपाठ






४.दुपार सत्र :- अध्यापन कार्य







५.सभेचा कार्यक्रम / सत्कार समारंभ
अ) सूत्र संचालन

ब) अध्यक्ष निवड
क) अनुमोदन
ड) प्रतिमापूजन




इ) प्रास्ताविक



फ) सत्कारसमारंभ











































 ग) विद्यार्थी शिक्षक मनोगत







घ) शिक्षक - प्रतिनिधी मनोगत

च) अध्यक्षीय मनोगत

छ) आभार प्रदर्शन

ज) वंदे मातरम - समारोप








No comments:

Post a Comment