Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 16 September 2017

फिफा मिलेनियन फुटबॉल दिन

फिफा मिलेनियन फुटबॉल दिन

विंचूर विद्यालयात फिफा मिलेनियन फुटबॉल दिन साजरा......
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे महाराष्ट्र शासन परिपत्रकानुसार मिलेनियन फुटबॉल मिशन अंतर्गत १५ सप्टेंबर रोजी फुटबॉल खेळात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी विंचूर ग्रामपालिका सरपंच सौ. ताराबाई क्षिरसागर यांचे हस्ते प्रतिमापूजन व विद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे उपाध्यक्ष श्री.कैलासशेठ सोनवणे यांचे हस्ते स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी पंचायत समिती सदस्य :-श्री.संजय शेवाळे, ग्रामपालिका सदस्य :- श्री. आत्माराम दरेकर, श्री.नाना जेऊघाले, श्री.प्रकाश मोरे उपस्थित होते. विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांनी गुलाबपुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले. विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. व जेष्ठशिक्षक श्री.ढवण पी.जी. यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचे आयोजन श्री.पाटील के.डी. यांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के. यांनी केले.












No comments:

Post a Comment