Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 3 October 2017

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती:- स्वच्छता अभियान

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती:- स्वच्छता अभियान


विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात २ ऑक्टोबर रोजी म.गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली. प्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. व व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री.गवळी एन.पी. होते. याप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थी कु. पल्लवी जाधव, कु.वैभवी पवार, कु.साक्षी दरेकर, कु.प्रेरणा जाधव, कु.वैष्णवी करमासे व. शुभम सोनवणे यांनी म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच सौ.ताराबाई क्षिरसागर व ग्रामसेवक श्री.खैरनार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के.यांनी केले.
यानंतर युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय नेहरू युवा केंद्र नाशिक व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्वच्छता अभियानपर विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व श्री.दिलीप शिंदे व बापू जाधव यांनी पटवून दिले. यानंतर महात्मा गांधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विद्यालय परिसर व गावातील शनी मंदिर, विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत परिसर अशा विविध महत्वाच्या ठिकाणची स्वच्छता विद्यार्थी व शिक्षकांनी केली.
                              
























No comments:

Post a Comment