Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 30 December 2017

विविध गुणदर्शन कार्यक्रम



विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न...................
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात नुकताच विविध कलागुणदर्शन सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.भास्करराव कोठावदे (अध्यक्ष नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोशिएशन लि. नाशिक) यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष श्री.काकासाहेब गुंजाळ होते तर प्रमुख अतिथी म्हणून श्री. सुभाष येवला चेअरमन सुवर्ण पतसंस्था नाशिक, श्री.केशवराव वाणी संचालक सुवर्ण पतसंस्था नाशिक तसेच श्री.माधवराव चव्हाण शाखाधिकारी सुवर्ण पतसंस्था विंचूर उपस्थित होते. प्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांनी केले. या कार्यक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पारितोषिके उत्तर विभाग सल्लागार समिती सदस्य श्री.सुनिलभाऊ मालपाणी यांच्या वतीने दरवर्षी दिली जातात. तसेच कार्यक्रमास देण्यात येणारा भव्य असा मंडप प्राध्यापक श्री.बोरसे ए.टी. यांनी दिला. नंतर सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विविध असे ३७ कार्यक्रम सादर करण्यात आले. यामध्ये नाटक, नृत्य, गायन, विनोद, शायरी अशा प्रकारचे विविध रंगी कार्यक्रम लहान गट ५ वी ते ७ वी व मोठा गट ८ वी ते १२ वी अशा दोन गटात वैयक्तिक व सामुहिक अशा प्रकारात सादर करण्यात आले. या कार्यक्रमात गुरुकुल प्रकल्पाच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा बहुसंख्येने सहभाग होता. या कार्यक्रमाचे परीक्षण वनसगाव विद्यालयाचे उपशिक्षक श्री.गोसावी जी.एस. व विंचूर ज्यू.कॉलेजचे प्राध्यापक श्री.पवार टी.ए. यांनी केले. या कार्यक्रमास विंचूर ग्रामपालिका सरपंच सौ.ताराबाई क्षीरसागर, उपसरपंच श्री.नानासाहेब जेऊघाले,सदस्य श्री.आत्माराम दरेकर, कमिटी सदस्य श्री.नारायणे गुरुजी, श्री.पंढरीनाथ दरेकर व पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष श्री.संजय शिरसाठ, सदस्य श्री.ज्ञानेश्वर सोनवणे, सौ.सुनिता जाधव तसेच ग्रामस्थ श्री.शंकरराव दरेकर, श्री.विनायक जेऊघाले, श्री.नरसिंह दरेकर, श्री.विकास दरेकर, श्री.कैलास ढवण, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चांदे आर.के., सौ.निकम के.एम व श्रीम.नागणे बी.आर. यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग सदस्य श्री.निकम एम.एस., श्री.खोंडे आर.सी, श्री.सरोदे पी.ए. सौ.सरोदे आर.पी. व सर्व सेवकवृंद यांनी विशेष सहकार्य केले. 






















No comments:

Post a Comment