Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 3 January 2018

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती - बालिका दिन (३ जानेवारी २०१८)

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन उच्च माध्यमिक विभागातील प्राध्यापिका श्रीम.गंधे एस.व्ही.यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता ११ वी विज्ञान वर्गातील विद्यार्थिनीनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीम.गंधे एस.व्ही. यांनी भूषविले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.वेदिका गोसावी हिने केले. विद्यालयातील सर्व स्त्री शिक्षिका याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होत्या. या सर्वांचा याप्रसंगी गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कु.नवले दामिनी, दौंड साक्षी, वैष्णवी क्षिरसागर, गोरे प्रिती, कल्याणी निकम, शरयू पवार, तेजस्विनी थोरात, शुभम नेवगे, यश आघाव, ओम जाधव इत्यादी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईच्या जीवनावर आधारित काव्ये, विचार, मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.पठाडे तेजश्री हिने केले. विद्यालयाचे उपशिक्षक श्री.पाटील जे.पी. व पर्यवेक्षक श्री.साळुंके ए.पी. यांनी कार्यक्रम सादर करणाऱ्या या विद्यार्थिनीचे कौतुक केले व आभार मानले.

 






No comments:

Post a Comment