Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Tuesday 16 January 2018

गुरुकुल क्षेत्रभेट

गुरुकुल क्षेत्रभेट दिनांक :- १६.१.२०१८

स्थळ : मातोश्री कै.हौसाबाई वामनशेठ दुसाने सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका विंचूर


                    कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर ता.निफाड जि.नाशिक येथील रयत गुरुकुल प्रकल्प अंतर्गत इयत्ता ५ वी ते १० वी ची क्षेत्रभेट नुकतीच मातोश्री कै.हौसाबाई वामनशेठ दुसाने सार्वजनिक वाचनालय व अभ्यासिका विंचूर येथे आयोजित करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षक गवळी एन.पी. यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व समजावून सांगितले. वाचनालयाचे अध्यक्ष श्री.अविनाशजी दुसाने यांनी वाचनालयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासिकेबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वाचन करावे व वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. हर्षल आव्हाड याने वाचनालयातील पुस्तके व इतर माहिती सांगितली. त्यानंतर वाचनालयात अभ्यासिकेस असलेले देविदास कापसे, गणेश शेवाळे, मयूर बडाख, शिवकन्या जंगम, अक्षदा भट्टड व कुणाल जेऊघाले इ.विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी असलेली वाचनाची आवश्यकता ही स्वानुभवाने पटवून दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंकाचे त्यांनी निरसन केले. शेवटी उपस्थितांचे विद्यालयाचे उपशिक्षक श्री.चांदे आर.के.व गुरुकुल प्रमुख श्री.निकम एम.एस. यांनी गुलाबपुष्प देऊन आभार मानले. क्षेत्रभेटीसाठी श्री.सरोदे पी.ए., श्री.खोंडे आर.सी., श्री.पिंगळे एन.बी., श्री.म्हस्के ए.जे., श्री.गाडेकर एस.पी., श्री.शेख एम.आय., सौ.सरोदे आर.पी., श्रीम.शिंदे जे.एस. इ.उपस्थित होते.



















1 comment: