Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 31 January 2018

हुतात्मा दिन - ३० जानेवारी

हुतात्मा दिन - ३० जानेवारी

महात्मा गांधी पुण्यतिथी

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे हुतात्मा दिन साजरा .........
                कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे ३० जानेवारी रोजी हुतात्मा दिन (महात्मा गांधी पुण्यतिथी)  साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांनी प्रतिमापूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. होते. विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी कु.अनुजा गाडेकर, तेजस्विनी थोरात, शरयू पवार, कुणाल नेवगे, शुभम नेवगे व सत्यम सोनवणे यांनी हुतात्मा दिन - महात्मा गांधी यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील उपशिक्षक श्री.चांदे आर.के. यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी., जेष्ठ्शिक्षक श्री.ढवण पी.जी., शेलार बी.ए., पाटील के.डी., गवळी एन.पी. हे मंचावर व विद्यार्थी , सर्व सेवक कार्यक्रमास उपस्थित होते. 













No comments:

Post a Comment