Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Wednesday 28 February 2018

२८ फेब्रुवारी २०१८ : राष्ट्रीय विज्ञान दिन

राष्ट्रीय विज्ञान दिन :- २८ फेब्रुवारी २०१८ 



विंचूर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा..............
विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील इयत्ता ६ वी अ च्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोशन गायकवाड याने केले. विज्ञान दिनाचे महत्व व सी.व्ही.रमण यांच्या कार्याबद्दलची माहिती प्रथमेश जाधव , कुणाल नेवगे, कु.वाघ मयुरी, कु.साक्षी शिरसाठ, कु.आरती सांगळे, कु.कावेरी खैरे यांनी आपल्या भाषणातून दिली. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री. प्रविण ढवण यांनी विज्ञानाचे महत्व व रामन परिणाम याविषयी तसेच विज्ञानामुळे संपूर्ण मानवजातीला व सृष्टीला विज्ञानाचा फायदा होतो हे आपल्या मनोगतातून पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रश्मी खैरे हिने केले तर आभार प्रदर्शन कु.कावेरी खैरे हिने केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य श्री.कापडणीस पी.टी. यांनी विद्यार्थ्याचे याप्रसंगी कौतुक केले.



















 

No comments:

Post a Comment