Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Thursday 8 March 2018

जागतिक महिला दिन दिनांक : ८ मार्च २०१८


 जागतिक महिला दिन दिनांक : ८ मार्च २०१८

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा
                  
            कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे जागतिक महिला दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कुलकर्णी व्ही.एस. होत्या.  याप्रसंगी विद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सत्यम सोनवणे, कु.तेजस्वी पठाडे, कु.दामिनी नवले, कु.शरयु पवार, कु.तेजस्विनी थोरात, कु.अक्सा मणियार इत्यादींनी महिला दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयातील उपशिक्षिका सौ. सरोदे आर.पी. यांनी महिला दिनाचे महत्त्व व इतिहास आपल्या मनोगतातून व्यक्त केला. उपशिक्षक श्री. चांदे आर.के. यांनी देखील आपल्या मनोगतातून  महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती कुलकर्णी मॅडम यांनी स्त्रियांचे समाजातील स्थान व महत्त्व आपल्या भाषणातून स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी निकम व आभारप्रदर्शन वेदिका गोसावी यांनी केले. याप्रसंगी मंचावर विद्यालयाचे प्राचार्य श्री कापडणीस पी.टी., उपमुख्याध्यापक श्री लाटे डी.सी., ज्येष्ठ शिक्षक श्री ढवण पी.जी., श्री आहेर पी.बी., श्री वर्पे यु.बी., श्री.के.डी पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी सेवक वृंद व कर्मचारी उपस्थित होते















































No comments:

Post a Comment