Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

Saturday 17 March 2018

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील - स्मृतिदिन

रयत माऊली :लक्ष्मीबाई भाऊराव पाटील - स्मृतिदिन

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय विंचूर येथे रयत माऊली :लक्ष्मीबाई भाऊराव पाटील - स्मृतिदिन साजरा...

              विंचूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात १७.०३.२०१८ रोजी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीम.कुलकर्णी व्ही.एस. होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी तेजस्विनी थोरात, शुभम नेवगे, अनुजा गाडेकर, शरयू पवार, कुणाल नेवगे, सत्यम सोनवणे, हृषीराज देवरे, राहुल कानडे, हर्षद जेऊघाले, कोमल वाजे, पल्लवी जाधव, अंकिता निकम इ. विद्यार्थ्यांनी लक्ष्मीबाई पाटील यांच्या जीवनकार्याचा गौरव आपल्या भाषणातून व्यक्त केला. शिक्षक प्रतिनिधी म्हणून जेष्ठ शिक्षक श्री.गवळी एन.पी.यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी इयत्ता १० वी ब च्या वर्गाकडून कर्मवीर व लक्ष्मीबाई यांची प्रतिमा विद्यालयास भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अपूर्वा बोडके व श्रुती पवार यांनी केले. विद्यालयाचे उपशिक्षक श्री.पाटील जे.पी. यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास उपमुख्याध्यापक श्री.लाटे डी.सी., पर्यवेक्षक श्री.पगार एस.पी. जेष्ठ शिक्षक श्री.ढवण पी.जी.,श्री.पाटील के.डी, श्री.चांदे आर.के. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.



















No comments:

Post a Comment